Buldhana Lok Sabha: '...फक्त थोडे दिवस थांबा', शिंदे - फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचा इशारा

Lok Sabha Election 2024: त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे, बुलढाणा लोकसभेतील सिंदखेडराजा येथील ठाकरे गटाच्या ‘जनसंवाद’ मेळाव्यात उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra FadnavisSaam Tv
Published On

Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis:

''ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करताय. फक्त थोडे दिवस थांबा. ज्यांना (शिंदे गट) शिवसैनिकांनी आमदार, खासदार केलं होतं, त्यांना आता माझा शिवसैनिक खाली पडणार'', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. बुलढाणा लोकसभेतील सिंदखेडराजा येथील ठाकरे गटाच्या ‘जनसंवाद’ मेळाव्यात उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे, माझ्याकडे जनसंपत्ती आहे. भाजपवाले स्वातंत्र्यलढ्यात कधीच नव्हते, मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं. ज्या शिवसेनेने तुम्हाला सत्तेची गादी दाखवली, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात?'' (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis
BMC New Commissioner: भूषण गगराणी यांनी स्वीकारला बीएमसी आयुक्तपदाचा कार्यभार, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

उद्धव ठाकरे म्हणाले, ''समोर कितीही भला मोठा शत्रू असला, तरी आपला राष्ट्राभिमान लाचारीसारखा त्यांच्या पायावर वाहून टाकायचा नाही. जय जिजाऊ, जय शिवराय‘ हे नातं काय आहे हे दाखवायचं असेल, तर त्यांना (भाजप आणि शिंदे गट ) येणाऱ्या निवडणुकीत पाडावंच लागेल.''  (Latest Marathi News)

'समोर संकट हुकूमशाहीचं'

ते पुढे म्हणाले, -''दुसऱ्या धर्माचा आहे, म्हणून त्याला मार हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला कधीच शिकवलेलं नाही. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. तळमळीने तुम्हाला सांगतोय, यावेळी चूक करू नका. त्यांना मत देऊ नका. समोर संकट हुकूमशाहीचं आहे.''

Uddhav Thackeray on Eknath Shinde and Devendra Fadnavis
Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट आहे ही पोस्टाची योजना, गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा

उद्धव ठाकरे म्हणाले, ''मला कुटुंबप्रमुख मानलंत. मी सांगितलेलं ऐकलंत. म्हणून कोरोनाकाळात आपण वाचू शकलो. आताही सांगतोय, भाजपच्या भूलथापांच्या नादी लागू नका. हुकूमशाहीला आजच गाडून टाका.''

याआधी हिंगोली लोकसभेतील अर्धापूर येथे सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ''शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, १० रुपयात शिवभोजन थाळी, संकटकाळात तसेच कोरोनाकाळात महाराष्ट्राला मदत. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार सर्वोत्तम होतं. मी हळद प्रक्रिया प्रकल्प हिंगोली जिल्ह्याला मंजूर करून दिला आणि आमदार, खासदार अंगाला हळद लावून तिथे (शिंदे गट) निघून गेले. ईडी, सीबीआयला घाबरून एकतर तुरुंगात जा, नाहीतर भाजपात जा, हाच पर्याय भ्रष्टाचाऱ्यांकडे आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com