Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : ...तरीही लढणारच!; दिग्गज नेत्याचा निर्धार, नवनीत राणांच्या अडचणीत वाढ

Lok Sabha Election 2024 : अमरावतीतून महायुतीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना आव्हान दिलं आहे. काहीही झालं तरी ब्रह्मदेव खाली आले तरी आम्ही निवडणूक लढणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

लोसकसभा निवडणुकांचं वातावरण राज्यात तापू लागलं आहे. आज शरद पवार गट आणि अजित पवार गटाने काही जगांवर उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान अमरावतीतून महायुतीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना आव्हान दिलं आहे. काहीही झालं तरी ब्रह्मदेव खाली आले तरी आम्ही निवडणूक लढणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी निवडणूक लढली तर अमरावतीत महायुती विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध नाही त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्यासोबत गेलो होतो त्यावेळी राजकीय विचार नव्हता सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही, कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आले तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

काल नांदेडमध्ये एक बैठक झाली. जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांची आणि संभाजीनगरला प्रमुख तालुक्याची संयुक्त बैठक आम्ही घेत आहोत. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे यासाठी ही बैठकआहे. मला असं वाटतं की आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही पोस्टमार्टम झालेला आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे.

मी पहिले सांगितले की आमची लढत ही मैत्री पूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तरी आता पुढचा निर्णय युतीने घ्यावा की आमची आणि त्यांची लढत त्यांच्या विरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर जावं की राहावं तो त्यांचा निर्णय सध्या महायुतीकडे आहे. ते जो निर्णय घेतील त्याचं आम्ही स्वागत करू. नवनीत राणा यांच्या बद्दलचा राग 100 पानाचा हायकोर्टाचा रिझल्ट दिला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे. आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह असं म्हटल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. असं असताना अडीच वर्षे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथे उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे या तानाशाहीच्याविरोधात आमची खरी लढाई असल्या तर बच्चू कडू यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

SCROLL FOR NEXT