Navneet Rana Rahul Shewale Yamini Jadhav Sadashiv Lokhande Sanjay Mandlik Hemant Godse Raju Parve Defeated in Maharashtra Election 2024 Result Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024 Result: राजकारण्यांचं बंड मतदारांनी केलं थंड; अनेकांचे बालेकिल्ले ढासाळले, कायमचं घरी बसवलं

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: बंडखोरी करणाऱ्या काही उमेदवारांना मतदारांना चांगलाच इंगा दाखवला. यात सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला. शिंदे गटाचे १५ तब्बल ८ उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला अस्मान दाखवलं. महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने कब्जा केला. दुसरीकडे महायुतीला फक्त १७ जागाच जिंकता आल्या. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महत्वाची बाब म्हणजे, बंडखोरी करणाऱ्या काही उमेदवारांना मतदारांना चांगलाच इंगा दाखवला.

यात सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसल्याचं दिसून आलं. शिंदे गटाचे १५ तब्बल ८ उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. यात काही विद्यमान खासदारांचा देखील समावेश होता. उद्धव ठाकरेंची साथ सोडून हे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. दुसरीकडे काँग्रेसला दगा देणाऱ्या नेत्याला देखील मतदारांनी नाकारल्याचं समोर आलं आहे.

रामटेकमधून राजू पारवेंचा पराभव

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राजू पारवे काँग्रेसमध्ये होते. मात्र, त्यानंतर पारवेंनी काँग्रेसमधील आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसने श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. रामटेकमधील मतदारांनीही बर्वे यांच्या झोळीत भरभरून मतं दिली. परिणामी राजू पारवेंचा पराभव झाला.

नाशिकमधून हेमंत गोडसेंचा पराभव

हेमंत गोडसे शिवसेनेच्या तिकिटावरून सलग दोनवेळा नाशिकमधून लोकसभेतून निवडून आले होते. मात्र, शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटात गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. वाजे यांनी गोडसेंचा दारुण पराभव केला.

दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव पराभूत

शिवसेना शिंदे गटात गेलेल्या यामिनी जाधव यांचा देखील पराभव झाला. यामिनी जाधव या शिवसेनेच्या आमदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली होती. सावंत यांनी त्यांचा दारुण पराभव केला.

यवतमाळमधून राजश्री पाटील यांचा पराभव

राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार होते. शिवसेना फुटीनंतर त्यांनीही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी त्यांचं तिकीट कापलं गेलं. हेमंत पाटील यांची मनधरणी करण्यासाठी शिंदेंनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, संजय देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.

दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळेंचा पराभव

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या अनिल देसाई यांनी शेवाळे यांना जवळपास ५४ हजार मतांनी पराभूत केलं.

शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव

शिर्डी लोकसभा मतदारसंघातही मोठी उलथापालथ झाली. सलग १० वर्षापासून खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव झाला.शिवसेना फुटीनंतर लोखंडे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्याचा पराभव केला.

कोल्हापूरमधून संजय मंडलिक पराभूत

उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनाही पराभवाचा धक्का बसला. काँग्रसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी तब्बल दीड लाख मताधिक्याने मंडलिक यांचा पराभव केला.

अमरावतीतून नवनीत राणांचा पराभव

नवनीत राणा यांनी २०१९ लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने लढवली होती. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी मोदी सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यंदा नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT