Uddhav Thackeray, Sharad Pawar Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election: नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे धक्कातंत्र; ठाकरे गटाचा वेगळाच प्लान?

Nashik Lok Sabha Constituency News Update in Marathi: शिवसेना नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. गोडसेंसमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत असल्याचे समजतंय.

Nandkumar Joshi

अभिजीत सोनावणे, नाशिक

Nashik Lok Sabha Constituency:

महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं मानलं जातंय. नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळं गोडसे यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी धक्कातंत्र अवलंबण्याच्या तयारीत असल्याचे समजतंय.

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर होण्यास काही तासच शिल्लक आहेत. महाराष्ट्रात भाजपनं जागावाटपात आघाडी घेतली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. हे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांची घोषणा अधिकृतपणे होण्याची शक्यता आहे.

राज्यात लोकसभेच्या (Maharashtra Election) अनेक मतदारसंघांबाबत पेच असला तरी, आपापल्या परीने राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. नाशिक मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचं निश्चित मानलं जात असून, शिवसेनेने हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचं सागितलं जात असलं तरी, महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) धक्कातंत्र अवलंबण्याची तयारी सुरू केली आहे.

अदलाबदल की पक्षप्रवेशानंतर उमेदवारी?

नाशिक मतदारसंघात शिवसेनेकडून हेमंत गोडसे मैदानात उतरणार असल्यानं त्यांना तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीनं डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्याबाबत चाचपणी केली जात असल्याचं सूत्रांकडून समजते.

पिंगळे हे इच्छुक उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांना ठाकरे गटात प्रवेश देऊन निवडणूक आखाड्यात उतरवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्याबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकची जागा ठाकरे गटाला सोडली असली तरी, बलाढ्य उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीत खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुंबईत आज बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकच्या उमेदवारीबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ते आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शाखांना भेटी देणार आहेत. डोंगरी आणि माझगाव या भागात ते शाखांना भेटी देतील. या दौऱ्यात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी 'वन टू वन' संवाद साधतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT