Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Amit Shah Sakal
लोकसभा २०२४

Maharashtra Election: घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं? उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा कोंडीत पकडलं

Uddhav Thackeray: भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्यामागे उद्धव ठाकरेंचं पुत्रप्रेम कारणीभूत ठरलं असल्याची टीका शहांनी एका सभेत केलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना वर्ध्यातील सभेत उत्तर दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Amit Shah: घराणेशाही बोंबलताय, मोदीजी घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं. ज्यांचं घराणे आहे, त्यांनीच बोलायचं का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना केलाय. महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील हिंगणघाट येथील टाका मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालाय. घराणेशाहीवरुन 'इंडिया' आघाडीला कोंडीत पकडणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना उद्धव ठाकरेंनी खडा सवाल करत मोदी आणि शहांना उद्धव ठाकरेंनी वर्ध्यातील प्रचारसभेत खडेबोल सुनावलेत. भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्यामागे उद्धव ठाकरेंचं पुत्रप्रेम कारणीभूत ठरलं असल्याची टीका शहांनी एका सभेत केलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी अमित शहांना वर्ध्यातील सभेत खडेबोल सुनावलेत.

अमित शहा घराणेशाहीवर बोलतात, उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून युती तोडली, असं शहा म्हणतात, पण अहो अमित शहाजी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल ही जनता मुख्यमंत्री करेल. तुमच्या आशीर्वादाची गरज नाही. मुख्यमंत्री पद हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद नाही, जसं तुम्ही जय शहाला तेथे जसं बसवलं तसं ते पद मिळत नाही.

त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला. १० वर्ष पंतप्रधान मोदींच्या सुखासाठी झटलो आणि आपल्या पदरात धोंडे पडलेत. पंतप्रधान मोदी सर्व उद्योग गुजरातला पळवून नेत आहे. दुसरीकडे विदर्भात बेकारी वाढत आहे. गेल्या १० वर्षात एकही उद्योग येथे आलेला नाही. जगाचा पोशिंदा संकटात आहे. तरुणांच्या हाताला काम नाहीये. तरीही ‘दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’ असे नरेंद्र मोदी म्हणतायेत. त्यांनी गुजरातला सर्व उद्योग नेल्याने आता मोदी यांनाही गुजरातला परत जा म्हणण्याची वेळ आलीय, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय.

पक्ष फोडून भाजपने गद्दारांना ५० खोके दिलेत. मी गेलो असतो, तर किती खोके मिळाले असते. मात्र माझं वैभव शिवसैनिक आहे. मुलाला मुख्यमंत्री करायचे होते म्हणून मी भाजपशी युती तोडली, असे अमित शहा सांगतात. पण मुख्यमंत्री होणे म्हणजे क्रिकेट कंट्रोल बार्डाचे अध्यक्षपद आहे का, असा टोला ठाकरेंनी लगावला.

मी नागरिकांच्या प्रेमासाठी भाजपविरोधात उभा राहिलोय. याआधी आपण वर्ध्यात कधीच निवडणूक प्रचारासाठी आलो नव्हतो. ही जागा नेहमी मित्रपक्षाला सोडत होतो. आता पण मित्रपक्षाला जागा दिलीय. पण आता मित्रपक्ष विजयी करण्यासाठी स्वतः मी येथे आल्यांच उद्धव ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Maharashtra Live News Update: श्री क्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT