Uttam Jankar  
लोकसभा २०२४

Maharashatra Election: शरद पवारांचा महायुतीला पुन्हा धोबीपछाड; उत्तम जानकरांचा शरद पवारांना पाठिंबा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Election Uttam Jankar : देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सर्व ऑफर धुडकावून अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी थेट विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी वेळापूर इथं जानकरांनी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं. मोहिते पाटलांना माढ्यातून तर बारामतीतून सुप्रिया सुळेंना विजयी करण्याचा एल्गार जानकरांनी केलाय. अजितदादांचा पराभव केल्यानंतरच पक्ष सोडणार असल्याचं वक्तव्यही जानकरांनी केलंय.

जानकरांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलंय. पण वेळापूरच्या जाहीर सभेतच उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली. मोहिते पाटलांचं भाषण सुरू असतानाच जानकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जाहीर सभेतच जानकरांची विधानसभेची उमेदवारी घोषित करून टाकली.

राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. गेल्या 30 वर्षांचं वैर संपवून माढ्यात मोहिते पाटील आणि जानकर एकाच मंचावर आले. मोहिते पाटलांसह जानकरांना पक्षात घेऊन शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय.धैर्यशील मोहितेंनी बंडाचा झेंडा फडकावल्यामुळे माढ्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. नाराज असलेल्या उत्तम जानकरांना विधानसभेचा शब्द देऊन गळाला लावण्यात पवारांना यश आलं. मोहिते पाटलांसह जानकरांनासोबत घेऊन पवारांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा सुरक्षित केल्याचं बोललं जातंय.

मोहिते पाटील आणि जानकरांनी भाजपच्या पराभवासाठी एल्गार पुकारलाय. जानकरांनी थेट अजित पवारांविरोधात जाहीर भूमिका घेऊन बंडाचा झेंडा फडकावलाय. भाजपसह महायुतीच्या सर्व खेळीनंतर शरद पवारांनी अखेरचा डाव टाकला आणि माढ्यात मोहिते पाटलांसह जानकरांना सोबत घेतलं. एकापाठोपाठ दोन मोहरे गळाला लावण्यात पवारांना यश आलं. मोहिते पाटलांसह जानकरांची आपापल्या मतदारसंघात स्वतंत्र ताकद आहे. तीच ताकद आता मविआच्या बाजूने आल्यानं महायुतीला धक्का बसणार हे निश्चित.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT