Maharashtra Election Yandex
लोकसभा २०२४

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

Mahayuti Seat Sharing Issue Shinde Group: महायुतीमधील पाच जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. शिंदे गटाचा जागांचा घोळ सुरूच असल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं आहे, तरी महायुतीमधील (Mahayuti Seat Sharing) पाच जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक राहिले आहेत, तरी ठाणे दक्षिण आणि वायव्य मुंबई, नाशिक आणि पालघर या जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. शिंदे गटाचा जागांचा घोळ सुरूच असल्याचं दिसत (Maharashtra Election) आहे.

काल देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागांचा तिढा सुटला, असं सांगितलं होतं. ठाणे मतदारसंघ हा शिंदे गटाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी आज ठाकरे गटाचे राजन विचारे अर्ज भरणार आहेत, तर या जागेवर शिंदे (Lok Sabha 2024) गटाकडून ठाण्याच्या माजी महापौर आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपनं देखील त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिल्याचं (Shinde Group) समजतंय.

ठाणे, दक्षिण आणि वायव्य मुंबई, नाशिक आणि पालघर या पाच जागांवर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले (Maharashtra Politics) नाहीत. भाजपच्या राजकारणापुढे शिंदे गटाची कोंडी होत असल्याची चर्चा सुरू (Mahayuti Seat Sharing Issue) आहे. महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघ शिंदे गट लढणार की भाजप लढणार, हा घोळ अनेक दिवस सुरू होता. तर दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात जाणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत शिंदे गटाला तीन जागा लढवायच्या आहेत, तर ठाकरे गट चार जागा (Lok Sabha Seat) लढवित आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिंदेसेनेवर टीका करण्यास अधिक वाव मिळेल, अशी भिती शिंदे गटाला असल्याचं दिसतंय. अजून नाशिकचाही तिढा कायम आहे. तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप (BJP) शिवसेनेत रस्सीखेच सुरूच आहे.

ठाण्यातील जागेसाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसत आहे. आता महायुतीत कोणती जागा शिंदे गटाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT