Harishchandra Chavan Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: दिंडोरी लोकसभेत भाजपच्या माजी खासदाराची बंडखोरी; भारती पवारांची डोकेदुखी वाढणार

Dindori Lok Sabha constituency : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली नसल्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी हा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

Harishchandra Chavan Dindori Lok Sabha constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप आणि महायुतीचं टेन्शन वाढलंय. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. हरिश्चंद्र चव्हाण उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने दिंडोरी मतदारसंघातून खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिलीय. भारती पवार यांना हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झालेत. २०१९ ला हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भाजपने भारती पवार यांना उमेदवारी दिली होती.

अपक्ष निवडणूक लढवणार

दुसऱ्यांदा संधी मिळाली नसल्याने भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं आहे. दरम्यान भाजपने डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी मिळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे प्रयत्न केला होता. मात्र शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या इच्छेला तडा गेलाय.

भारती पवार यांची डोकेदुखी वाढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानेही उमेदवारी न दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या भारती पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यामुळे मतविभाजन होऊ शकते. याचा अप्रत्यक्ष फायदा शरद पवार गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळेस निवडून आले होते. २०१९ मध्ये ते तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी होती. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. भारती पवार आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. चव्हाण यांनी २०१४ मध्ये भारती पवार यांचा दारुण पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT