Supriya Sule Won From Baramati
Baramati Loksabha Election Result Saam TV
लोकसभा २०२४

Baramati Loksabha Election Result: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवार यांचा पराभव

Priya More

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Loksabha Constituency) महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा १ लाख ८ हजार ४९० जास्त मतं मिळाली आहेत. सुप्रिया सुळे यांना ५,५९,६४५ मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना ४,५०, ५८२ इतकी मतं मिळाली.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. खऱ्या अर्थाने ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्येच झाली होती. दोघांनी देखील आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते आणि संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. पण या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना पुन्हा खासदार होण्यात यश मिळाले आहे. सुप्रिया सुळे या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत.

बारामतीमध्ये शरद पवार यांची रणनिती याठिकाणी यशस्वी ठरली आहे. सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्याचे कळताच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरूवात केली आहे. ठिकठिकाणी गुलाल उधळून, फटाके फोडून तर ढोल ताश्याच्या गजरामध्ये कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे विजयी झाल्यामुळे बारामतीकर आनंदी झाले आहेत.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या २००९ पासून खासदार आहेत. २०१४च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना ५,२१,५६२ तर महादेव जानकर यांना ४,५१,८४३ इतकी मतं पडली होती. २०१९ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता. सुप्रिया सुळे यांना ६८६,७१४ तर कांचन कुल यांना ५,३०,९४० इतकी मतं पडली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Rain Update: कोकणासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी

Belapur Fort: 'बेलापूर' किल्ल्याचा इतिहास खूपच रंजक, नाव कसं पडलं?

Blood Pressure : अचानक ब्लड प्रेशर वाढला? घाबरु नका; घरच्याघरी करा हा उपाय

Marathi Live News Updates : मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, येलो अलर्ट जारी

Jalgaon Accident : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; अपघातात तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT