lanke nilesh Saam Tv
लोकसभा २०२४

Nilesh Lanke: अहमदनगरमधून निलेश लंके विजयी, सुजय विखे-पाटील यांचा केला पराभव

Ahmednagar Lok Sabha Constituency: अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निलेश लंके यांनी २९,३१७ मतांनी सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला.

Priya More

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) विजयी झाले आहेत. निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe- Patil) यांचा जोरदार पराभव केला. निलेश लंके यांनी २९,३१७ मतांनी सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला आहे. निलेश लंके यांच्या विजयानंतर अहमदनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयाच्या जवळ आल्यानंतर ते मतमोजणी केंद्रात आले होते. निलेश लंके मतमोजणी केंद्रात येताच राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 'हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभा राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचा विजय आहे.', असे सांगितले.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे सुजय विखे पाटील यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच दिसून आली होती. सहाव्या फेरीनंतर निलेश लंके पुढे होते. त्यांचे मताधिक्य २० हजारांच्या आसपास होते. 22 व्या फेरी अखेर निलेश लंके हे १८ हजार मतांनी पुढे गेले. त्यानंतर त्यांनी सुजय विखे पाटील यांना मागे टाकत सर्व फेऱ्यांमध्ये आघाडीवर राहिले. निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये शेवटपर्यंत अटी तटीची लढत राहिली. शेवटी निलेश लंके यांनी विजय मिळवला. अहमदनगरकरांनी निलेश लंके यांना पसंती दिली.

निलेश लंके विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगरमध्ये ठिकठिकाणी फटाके फोडून, ढोल-ताशे वाजवून जल्लोष केला. निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. सध्या अहमदनगरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मतदारसंघात सुजय विखे-पाटील हे खासदार होते. त्यांनी यावेळी दुसऱ्यांना लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video of Namaz at Shaniwarwada: 'ते' एक ट्विट आणि शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; ऐन दिवाळीत पुण्यातील वातावरण का तापले?

Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?

दिवाळीत धमाका! शिंदेंचा थेट फडणवीसांना धक्का, भाजपच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

SCROLL FOR NEXT