Naresh Mhaske: ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के विजयी, विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे घेतले आशीर्वाद

Thane Lok Sabha Constituency: ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के 2 लाख 51 हजार 16 पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला.
Naresh Mhaske: ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के विजयी, विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे घेतले आशीर्वाद
Naresh MhaskeSaam Tv
Published On

ठाणे लोकसभा मतदारसंघातून (Thane Loksabha Election 2024) महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 7 लाख 31 हजार 927 मतं मिळावी आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना 5 लाख 15 हजार 876 मतं मिळाली. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जवळपास 2 लाख 51 हजार 16 पेक्षा जास्त मतांनी राजन विचारे यांचा पराभव केला. नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

विजयी झाल्यानंतर ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नरेश म्हस्के यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आशीर्वाद देखील दिला. नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी हरी निवास सर्कल या ठिकाणी जल्लोष केला. ढोल-ताशाच्या गजरामध्ये शिवसैनकांनी एकच जल्लोष केला.

नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ठाणे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विजय हा माननीय नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली मेहनत आणि एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील असलेलं स्थान त्यांचा हा विजय आहे. आनंद दिघे यांच्या आशीर्वादाचा खऱ्या अर्थाने हा विजय आहे. जनतेने दाखवून दिले आहे खरा आनंद दिघे यांचा शिष्य कोण आहे. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची परंपरा कायम ठेवली आहे.'

Naresh Mhaske: ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के विजयी, विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे घेतले आशीर्वाद
Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

नरेश म्हस्के यांनी पुढे असे देखील सांगितले, '12 दिवसांत एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना खासदार बनवले आहे. विरोधक कशात प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला महिती आहे. गद्दारी कोणी केली हे माहिती आहे आणि आज ते जनतेने दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिघे यांचे नाव, सण, उत्सव, त्याचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले. मात्र विरोधकांनी आनंद दिघे यांचं नाव मागे करून स्वतःच नाव पुढे नेले. नक्कीच संसदेत जायला आवडेल. खासदारकीची जी कामे असतात ती सर्व कामे मतदारसंघातील नक्कीच मार्गी लागतील.

Naresh Mhaske: ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के विजयी, विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे घेतले आशीर्वाद
Madha Loksabha Result: पवारांचा डाव भाजपवर भारी! माढ्यात तुतारी वाजली; धैर्यशिल मोहिते पाटलांचा दणदणीत विजय

तसंच, 'महायुती पिछाडीवर गेली असं म्हणता येणार नाही. चुकीचे गैरसमज अफवा पसरवून विरोधकांनी निवडणूक लढवलेली आहे. संविधान बदलणार अशी भीती दाखवून मुल्ला मौलवी यांना लाखो रुपये वाटून निवडणूक लढलेली आहे. एकाच वेळी सर्व लोकांना एकत्र करून मोदींच्या विरोधात ही निवडणूक महाविकास आघाडीने लढवली आहे. हा जो विजय आहे त्याच्या मागे एकनाथ शिंदे आणि लता शिंदे ह्या आहेत. स्वतःच्या मुलाच्या प्रचाराला न जाता माझ्या प्रचाराला आल्या आहेत त्यांचा हा विजय आहे. 12 दिवसांचा मी खासदार आहे इथून पुढेही कार्यकर्ता म्हणून राहण्याचा प्रयत्न करणार आहे.', असे देखील नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Naresh Mhaske: ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के विजयी, विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे घेतले आशीर्वाद
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने उधळला गुलाल; १ लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळाल्याने जल्लोष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com