Uddhav Thackeray In Shirdi Rally 
लोकसभा २०२४

Maharashatra Election: GST, शेतकरी, आशा सेविकांच्या मानधनावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिर्डी : राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यावर भाजप साधं 'आ' सुद्धा म्हणत नाही. शेतकऱ्यांच्या बायकोचं मंगळसूत्र तुटत आहे, त्यावर ते काही बोलत नाहीत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरही ते बोलत नाहीत. यामुळे मित्रांनो यांना सोडायचं नाही. या निवडणुकीत भाजपला, असा पडा की त्यांच्या नाकाला कांदा लावावा लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात चढवला.

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलतांना उद्धव ठाकरेंनी जीएसटी, महागाई, आशा सेविका, अदानी- अंबानी, मणिपूर अशा विषयावर उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान घाणाघाती टीका केली.

काँग्रेसचे सरकार असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर महागाईवरून टीका केली जात होती.पंतप्रधानांनी महागाईचा म सुद्धा काढला नाही, अशी टीका मोदी मनमोहन सिंग यांच्यावर करत होते. आता स्वत:पंतप्रधान शिर्डीत आले होते, पण त्यांनी महागाईचा विषयसुद्धा घेतला नाही.भाजप गाईवर बोलतात मग महागाईवर का नाही, असा सवालही उद्धव ठाकरेंनी शिर्डीत केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT