Satyajeet Tambe Support To Vishal Patil
Satyajeet Tambe Support To Vishal Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashatra Election: 'त्यांच्यावर अन्याय झालाय'; विशाल पाटलांच्या समर्थनार्थ सत्यजित तांबे उतरले मैदानात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सचिन बनसोडे, अहमदनगर)

Satyajeet Tambe Support To Vishal Patil:

सांगलीत बंडखोरी करणारे काँग्रेस नेते विशाल पाटील यांना काँग्रेसमधून पाठिंबा मिळू लागलाय. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. यामुळे महाविकास आघाडीचा सांगलीमधील वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.

सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ ट्विट ( X ) करत त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात.. काँग्रेसमध्ये युवकांना संधी नाकारल्या जात असल्याचेच या ट्विटच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी अधोरेखित केल्याचे बघायला मिळतेय.

काय आहे सत्यजित तांबे यांचे ट्विट -

विशाल दादा... ऑल द बेस्ट

विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे.

वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत.

विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी.

काँग्रेसला उमेदवारी मिळावी

सत्यजित तांबे यांचा पाठिंबा मिळाल्याने विशाल पाटील यांच्या बंडखोरीला ताकद मिळालीय. पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीतील वाद वाढण्याची शक्यता आहे. सांगलीमधील उमेदवारी ही काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी विशाल पाटील यांनी केलीय. काँग्रेस एकसंघ होती, हे कुणाला बघवले नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन. पण काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवून जावेत, असा उद्देश काही जणांचा आहे, मला अजून ही विश्वास आहे. मला उमेदवारी मिळेल'', असं काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covaxin लस घेतलेल्या लोकांसाठी मोठी बातमी! कोव्हिशील्डसारखेच आहे लशीचे दुष्पपरिणाम, तरुणींवर अधिक परिणाम

Diabetes: मधुमेहांच्या रुग्णांसाठी 'या' भाज्या खाल्ल्यास ठरेल फायदेशीर

Narendra Modi News | मोदींचे कटआऊट हटवले, शिवाजी पार्कात जोरदार राडा

Sambhajinagar News : मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकाचं नुकसान होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT