Siddhi Hande
सध्या कॉटन साडीचा ट्रेंड आहे. कॉटन साड्या या प्रत्येक लूकसाठी एकदम परफेक्ट आहेत.
कॉटन साडीत अनेक रंग असतात. ऑफिस वेअर, डेली वेअर किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी या साड्या नेसाव्यात.
कॉटनच्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज घातल्यावर त्याला अजूनच लूक येईल. तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा.
तुम्ही अबोली रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा ब्लाउज घालू शकतात. एकदम मिनिमल प्लेन रंगाची साडी आणि त्यावर प्लेन ब्लाउज शोभून दिसेल.
पोपटी रंगाच्या साडीवर तुम्ही कलमकारी ब्लाउज घालू शकतात. हा ब्लाउज वेगवेगळ्या रंगात घालू शकतात.
हिरव्या प्लेन साडीवर तुम्ही मरुन रंगाचा ब्लाउज घालू शकतात. हे कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसेल.
तुम्ही लव्हेंडर रंगाच्या साडीवर व्हाईट ब्लाउज ट्राय करु शकतात. यावर तुम्ही इतर वेगवेगळे कलरदेखील घालू शकतात. या साडीवर प्लेन ब्लाउजदेखील सुंदर दिसेल.
तुम्ही कोणत्याही कॉटनच्या साडीवर त्याच डिझाइनचा ब्लाउज घालू शकतात. हा ब्लाउज परफेक्ट फिट आहे.
ब्लू रंगाच्या साडीवर तुम्ही व्हाईट ब्लाउज घालू शकतात. या साडीवर स्लिव्हलेस ब्लाउजदेखील सुंदर दिसू शकतो.
हिरवी साडी अन् त्यावर निळ्या रंगाचा बंद गळ्याचा ब्लाउज छान दिसेल.
व्हाईट साडीवर तुम्ही हिरवा, निळा किंवा चॉकलेटी रंगाचा कोणताही ब्लाउज घालू शकतात. हा खूपच सुंदर लूक देईल.