Ajit Pawar Maharahstra Election  
लोकसभा २०२४

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Maharahstra Election Ajit Pawar: बारामतीच्या मतदानानंतर चौथ्या टप्प्यात अजित पवारांनी शिरूर, नगर आणि बीडमधल्या महायुतीच्या सभा चांगल्याच गाजवल्या. पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारात अजित पवार कुठेच दिसत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर

बारामतीच्या मतदानानंतर चौथ्या टप्प्यात अजित पवारांनी शिरूर, नगर आणि बीडमधल्या महायुतीच्या सभा चांगल्याच गाजवल्या. उमेदवारांपासून विरोधी आमदारांपर्यंत सर्वांना दम भरला. मात्र अखेरच्या टप्प्यात अजितदादा कुठे गायब झाले असा सर्वांनाच प्रश्न पडला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या मुंबईतल्या रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ उपस्थितच नव्हते.

तर रोड शोच्या नियोजनासाठी शिंदे कल्याणमधील मोदींची सभा अर्ध्यावर सोडून गेले. मात्र मोदी रोड शोसाठी आल्यानंतर त्याठिकाणी सर्वांना खटकली ती अजित पवारांची गैरहजेरी. अजितदादा नाराज आहेत की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. मात्र दादांच्या दांडीवर चक्क शरद पवारांनी खुलासा करत त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

राजकीय विरोधक असलेल्या काकांनी अजितदादांवर सर्वात आधी खुलासा केल्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच अडचण झाली. मग नेमकं अजितदादा कसे आजारी पडले याचा घटनाक्रमच त्यांनी मांडला. मात्र हे सांगताना अजित पवार गटानं विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. महायुतीच्या प्रचारात गैरहजेरीची अजितदादांची ही पहिलीच वेळ नाही..तर

अजित पवार आहेत कुठे?

धाराशिवकडे पाठ मात्र बारामतीतच ठाण

दिंडोरीतील सभेतही दादांऐवजी भुजबळांची उपस्थिती

कल्याणच्या सभेत दादांऐवजी तटकरेंची उपस्थिती

वाराणसीत मोदींनी अर्ज भरला मात्र त्यावेळी दादा गैरजहर

नाशिकच्या मोदींच्या सभेतही दादांऐवजी भुजबळच

मुंबईत मोदींचा रोड शो, दादा मात्र गैरहजर

दादांचा अचानक दांडी मारण्याचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा अजित पवार अचानक गायब झाले तेव्हा पवारांनीच त्याच्याबाबत पहिला खुलासा केला. आता विरोधात असले तरीही काकांनीच पुतण्याच्या गैरहजेरीवर सर्वात आधी खुलासा करून विरोधकांवर कुरघोडी केली. आता घशाच्या त्रासामुळे अजितदादा भाषण करू शकत नसले तरी शिवाजीपार्कवरच्या मोदींच्या सभेला निदान हजेरी तरी लावतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वडाळ्यातून सलग नवव्यांदा कालिदास कोलंबकर विजयी

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

SCROLL FOR NEXT