Sanjay waghere and ajit pawar Saam tv
लोकसभा २०२४

Maval Lok Sabha : मावळ लोकसभेत मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sanjay waghere and ajit pawar : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना नमस्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे शुक्रवारी पिंपरी विधानसभाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळा होता. या सोहळ्याला काल रात्री उशिरा अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधू-वरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता.

2019 च्या मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुण पराभव केला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग आप्पा बारणे यांचं महायुतीत प्रचार करताना दिसत आहेत,असं असताना त्यांच्या काही महिन्यापूर्वीचे खंदे समर्थक तसेच 2024 चे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुका पूर्वी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.

अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांच्या पाटील यांच्यासोबत लग्न समारंभात जेवण करत असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळलं आहे. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. हीच महाराष्ट्रातील खेळी - मेळीचं राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यात वावगं काही नाही, अशी प्रतिक्रिया संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खा. निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे...

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

Jeans: जीन्स घालाल तर जेलमध्ये जाल? 'या' ठिकाणी जीन्स घालण्यावर बंदी

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

Palghar Tourism : ना मरीन ड्राईव्ह, ना जुहू चौपाटी; वीकेंडला करा 'या' समुद्रकिनाऱ्याची सफर

SCROLL FOR NEXT