लोकसभा २०२४

Madhya Pradesh Exit Poll 2024: मध्य प्रदेशात 'इंडिया' आघाडीचं टेन्शन वाढणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

Loksabha Election Exit Poll : लोकसभा निवडणूक २०२४ देशभरात ७ टप्प्यात पार पडली. यासोबतच एक्झिट पोलचे आकडेही समोर आलेत. महाराष्ट्रात काठावर पास होणाऱ्या भाजपचे मध्य प्रदेशात काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तर 'इंडिया' आघाडीला मध्य प्रदेशातील जनत स्वीकारणार का हे पाहवं लागेल.

Bharat Jadhav

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीसाठी देशभरात ७ टप्प्यांत ५४३ जागांवर मतदान झाले. आता सर्वांनाच ४ जून २०२४ रोजी जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. महाराष्ट्रातील ४८ प्लसच्या घोषणेला सुरुंग लागता दिसत आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांवरही सर्वांच्या नजरा लागल्यात. न्यूज २४, चाणक्यच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून यात भाजप क्लीन स्वीप करताना दिसत आहे.

देशातील दोन मोठ्या पक्षांमध्ये मध्य प्रदेशात रंजक लढत पाहायला मिळतेय. भाजप आणि काँग्रेसमधील निवडणुकीतील रंगत स्पष्ट दिसतेय. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कोणाची आघाडी आहे? कोणत्या पक्षाने मध्य प्रदेशातील लोकांची मने जिंकली? ते पाहुया. मध्य प्रदेशात भाजप सर्वाधिक जागा जिंकताना दिसत आहे.

News24 Todays Chanakya - भाजप -२९, काँग्रेस - ०, अन्य- ०

India TV CNX- २८-२९, काँग्रेस ०१, अन्य-०

ABP C Voter - २६-२८, काँग्रेस १-३,अन्य-०

Aaj Tak My Axis- भाजप २८-२९, काँग्रेस ०१, अन्य ०

Tv9 Polstart

Peoples InSight - भाजप २९, काँग्रेस-०, अन्य- ०

लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जागा वगळता सर्व जागा जिंकल्या होत्या. मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी भाजपने २८ जागा जिंकल्या होत्या. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता यावेळीही मध्य प्रदेशात तेच वारे वाहत असल्याचे दिसते. यावेळी राज्यातील सर्व जागा भाजपच जिंकेल, असा दावा भाजपच्या सर्व नेत्यांकडून केला जात आहे. तर जनता भाजपला धडा शिकवेल असा काँग्रेसचा दावा आहे. १८व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT