Madha loksabha Constituency News:
Madha loksabha Constituency News:  Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: शरद पवारांनी रात्रीत सूत्रे फिरवली! अनिकेत देशमुखांचे बंड थंड; उत्तम जानकरही आज 'तुतारी' हाती घेणार

भारत नागणे

पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. माढ्यातून शेकापचे अनिकेत देशमुख हे बंडाच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंड झाले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र अनिकेत देशमुख यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी रात्री तातडीने बारामतीला बोलावून घेत त्यांची नाराजी दूर केली. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, माढ्यामध्ये महायुतीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तम जानकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यावेळी उत्तम जानकर यांच्यासोबत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील अनेक बडे नेते शरद पवारांच्या पक्षात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नितीन गडकरी आणि आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी कोसळणार

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

SCROLL FOR NEXT