Maharashtra Politics News:
Maharashtra Politics News:  Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: माढ्यात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री! महादेव जानकरांचे पुतणे स्वरुप जानकर आज अर्ज भरणार

Gangappa Pujari

सागर आव्हाड,|ता. १९ एप्रिल २०२४

माढा लोकसभा मतदार संघात आता तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरुप जानकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. स्वरुप जानकर हे बहुजन समाज पार्टीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

रासपचे नेते महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पुतणे स्वरुप जानकर यांनी मोठ्या बंडाचा इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वीच स्वरुप जानकर यांनी माढ्यातून लोकसभा लढवणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र स्वरुप जानकर कोणत्या पक्षातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नव्हते.

अखेर आता स्वरुप जानकर हे राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. स्वरुप जानकर यांना बहुजन समाज पार्टीने तिकीट दिले असून आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढ्यातील विविध प्रश्न, तसेच बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माढ्यात तिरंगी लढत!

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. अशातच आता स्वरुप जानकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने माढ्यातील लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबत एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT