Madha Loksabha Constituency News:
Madha Loksabha Constituency News: Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: माढ्यात मोठ्या घडामोडी! जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे शरद पवारांच्या भेटीला; महायुतीचं टेन्शन वाढणार?

Gangappa Pujari

ओंकार कदम, सातारा|ता. १६ एप्रिल २०२४

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपसह महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अशातच माण- खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधु शिवसेनेचे शेखर गोरे यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

माढ्यात घडामोडींना वेग...

माढा मतदार संघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध नुकतेच शरद पवारांच्या गोटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे मोहिते पाटील कुटुंबासह फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरही रणजित निंबाळकरांना विरोध करण्याची शक्यता असतानाच माण- खटाव तालुक्यातही भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेखर गोरे शरद पवारांच्या भेटीला..

महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधु शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. रात्री उशिरा बारामतीमध्ये शेखर गोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीवेळी ष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे देखील उपस्थित होते.

माण- खटावमध्ये गोरे बंधुंचा संघर्ष...

दरम्यान, माण खटाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गोरे बंधुंमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. माण खटाव विधानसभेत शेखर गोरेंचे आमदार जयकुमार गोरे यांना तगडे आव्हान आहे. जयकुमार गोरेंप्रमाणेच शेखर गोरेंचीही या मतदार संघात मोठी ताकद आहे. त्यामुळे माढ्यात शेखर गोरेंची भूमिका ठरणार निर्णायक ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Trip: अमृताची आई वडिलांसोबत लंडनवारी; ट्रीपचे फोटो पाहा

Eknath Shinde News | मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी! मोठी बातमी...

Today's Marathi News Live : Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT