Loksabha Election: अजित पवारांच्या पराभवासाठी शिंदेंचं बजेट'; शिंदेंच्या रडारवर अजितदादांचेच उमेदवार?
Loksabha Election Ajit pawar vs Eknath Shinde 
लोकसभा २०२४

Loksabha Election: अजित पवारांच्या पराभवासाठी शिंदेंचं बजेट'; शिंदेंच्या रडारवर अजितदादांचेच उमेदवार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीचं मतदान झालं आणि आता ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून आरोपांची मालिकाच सुरु केलीय. तर या आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.संजय राऊतांनी लिहीलेल्या रोखठोक सदरात मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी खास यंत्रणाच उभी केल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय.

दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवून नेते बनवले. हे नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदेंनी या निवडणूकीत अफाट पैशाचा वापर केलाय. प्रत्येक मतदारसंघात 25-30 कोटी वाटले. काही ठिकाणी उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट. अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंच्या यंत्रणेचे खास प्रयत्न. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणुकीतील पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले. भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने लोकांनाही भ्रष्ट केले.

भाजप-शिवसेना युतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एण्ट्री झाल्यामुळे शिंदेंचा सत्तेतला वाटा कमी झाला. मात्र लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या तुलनेच शिंदे चांगलेच वरचढ ठरले. अजित पवारांच्या पदरात केवळ चार जागा पडल्या. आता त्या जागांबाबतही महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जातंय.

बारामतीत तर अजित पवारांच्या पत्नी मैदानात असतानाही शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतरेंनी सुरूवातीला उघड उघड शड्डू ठोकले होते. त्यामुळे ते त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात किती मदत केली याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

लोकसभा निवडणूकीनंतर राऊतांनी आरोप करत राळ उडवून दिलीय. त्यामुळे महायुतीचा 45 पारचा केवळ नाराच होता की तो खरा ठरवण्यासाठी ग्राऊंडवर एकीनं लढले हे 4 जूनच्या निकालावरूनच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

Mumabi Traffic: अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा; पाच दिवसांसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

Special Report: पृथ्वीवर आदळणार लघुग्रह? मानवाचं अस्तित्व धोक्यात?

Woman Dance Video : 'आगे है बरसात, पीछे है...'; भरपावसात महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल, 'चाक धूम धूम...'

SCROLL FOR NEXT