विनोद पाटील, साम प्रतिनिधी
मुंबई: भुजबळांनी महायुतीला हा खबरदारीचा इशारा दिलाय. याला कारणही तसंच आहे. एक म्हणजे मनुस्मृती आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकातला भाजपचा 400 पारचा नारा. भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 400 पारचा नारा दिला खरा. मात्र भाजपच्या काही नेत्यांनी याला थेट संविधान बदलाशी जोडलं आणि हा नारा भाजपच्या अंगलट आला.
कारण खरंच संविधान बदलणार की काय,अशी भीती दलित आणि वंचित घटकांमध्ये पसरल्याचा दावा भुजबळांनी अनेकदा बोलून दाखवला. एवढंच नव्हे तर स्वत: नरेंद्र मोदींनाही यावर जाहीर भाषणांमधून स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र हा वाद शमत नाही तोवर मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून महायुती सरकारनं पुन्हा वाद नवा ओढवून घेतला. त्यामुळे अस्वस्थ भुजबळांनी भाजपचे चांगलेच कान टोचले आहेत.
महायुती सरकारच्या अनेक मुद्दांवर आणि ध्येयधोरणांवर भुजबळांनी जाहीररित्या टीका केलीय. त्यामुळे भुजबळ अस्वस्थ असून ते पुन्हा शरद पवारांकडे परतणार का याची चर्चा सुरू झालीय. भुजबळच काय ते याबाबत सांगू शकतील असं शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांचे दरवाजे भुजबळांची खुले असल्याचीही चर्चा रंगलीय.
चारसो पारनंतर मनुस्मृतीच्या मुद्दयामुळे भुजबळ अधिक अस्वस्थ आहेत. कारण भुजबळांचं संपूर्ण राजकारण फुले-शाह-आंबेडकरांच्या विचारावर आधारित आहे. मनुस्मृतीसारख्या मुद्यावरून महायुतीला माघार घ्यावी लागली. मात्र जो संदेश जायचा तो गेला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे अडचणीचं ठरू नये म्हणून भुजबळांनी भाजपला वेळीच सावध होण्याचा इशारा दिलाय. मात्र भाजप आपलं धोरण बदलेल की भुजबळ आपला मार्ग बदलतील हा खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.