Rahul Gandhi Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: '४ जूनला नवी पहाट, अहंकार, अत्याचाराचे प्रतिक बनलेल्या सरकारवर अंतिम प्रहार करा'; राहुल गांधींचे देशवासियांना आवाहन!

Loksabha Election 7 Phase Voting: लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच ४ जूनच्या निकालावरही त्यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. १ जून २०२४

देशातील लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरातील ५७ लोकसभा मतदार संघांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदार संघाचाही समावेश आहे. आजच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून सर्वांनी मतदान करण्याच आवाहन केले आहे.

"प्रिय देशवासियांनो, आज मतदानाचा सातवा आणि अंतिम टप्पा आहे आणि आतापर्यंतच्या मतदानावरुन हे स्पष्ट झाले आहे की देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मला अभिमान आहे की कडक उन्हामध्येही आपण सर्व लोकशाही आणि घटनेचे रक्षण करण्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर आला आहात, असे राहुल गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तसेच "आजही मोठ्या संख्येने घराबाहेर पडून अहंकार आणि अत्याचारांचे प्रतीक बनलेल्या या सरकारवर 'अंतिम प्रहार करा, जूनचा सूर्य देशात नवीन पहाट आणणार आहे," असे आवाहनही राहुल गांधी यांनी देशवायिसांना केले.

दरम्यान, आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची राजधानी नवी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी दिवशी काय खबरदारी घ्यावी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यासह इतर पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Box For Tractors: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची सक्ती; नव्या नियमांवर संतापाची लाट

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

SCROLL FOR NEXT