Shivaji Adhalarao Patil Vs Amol Kolhe SaamTv
लोकसभा २०२४

Shirur Loksabha Election 2024: कोण होणार शिरूरचा खासदार?, अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

Shivaji Adhalarao Patil Vs Amol Kolhe: २००९ मध्ये या मतदार संघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार झाले होते. २०१४ मध्ये देखील तेच खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीनंतर या मतदारसंघाला अमोल कोल्हेंच्या रूपात नवा खासदार मिळाला.

Priya More

शिरूर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha Election 2024) हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. २००९ मध्ये या मतदार संघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao adhalarao patil) हे खासदार झाले होते. २०१४ मध्ये देखील तेच खासदार होते. २०१९ च्या निवडणुकीनंतर या मतदारसंघाला अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) रूपात नवा खासदार मिळाला. आता २०२४ मध्ये या मतदार संघामध्ये पुन्हा आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे निवडणूक लढवणार आहे. यावेळी देखील या दोघांमध्ये तगडी लढत होणार आहे. दोघांनाही निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये होणार आहे.

६ विधानसभा मतदारसंघात कोणचे किती आमदार -

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी शिरूर, भोसरी आणि हडपसर यांचा समावेश आहे. जुन्नरमध्ये अतुल वल्लभ बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट), आंबेगावमध्ये दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट), खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट), शिरूरमध्ये अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), भोसरीमध्ये महेश लांडगे (भाजप) आणि हडपसरमध्ये चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट) हे आमदार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न -

- या मतदारसंघात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे

- वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील कायम आहे.

- शेतीला दिवसा वीज मिळत नाही.

- शेतमालाला हमीभाव नाही.

- भात आणि हिरड्याला बाजारपेठ नाही.

- दुग्ध व्यवसाय संकटात आहे.

शिरूरमधील बदललेली राजकिय समीकरणे -

- २०१९ ला शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत होते आणि कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

- आता आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आले. तर अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आले आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अमोल कोल्हे शरद पवारांसोबत राहिले.

- शिवसेनेच्या फुटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटासोबत गेले.

- शरद पवार गटाने विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पुन्हा संधी दिली.

- अजित पवारांना उमेदवार मिळेना त्यामुळे शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली.

मतांची आकडेवारी - २०१९

- अमोल कोल्हे - राष्ट्रवादी - ६ लाख ३५ हजार ८३०

- शिवाजी आढळराव पाटील - शिवसेना - ५ लाख ७७ हजार ३४७

मतांची आकडेवारी - २०१४

- शिवाजी आढळराव पाटील - शिवसेना - ६ लाख ४३ हजार ४१५

- देवदत्त निकम - राष्ट्रवादी - ३ लाख ४१ हजार ६०१

मतांची आकडेवारी - २००९

- शिवाजी आढळराव पाटील - शिवसेना - ४ लाख ८२ हजार ५६३

- विलास विठोबा लांडे - राष्ट्रवादी - ३ लाख ०३ हजार ९५२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : टीम इंडियाच्या या खेळाडूची Ex पत्नीची बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री?

Pune News: पुण्यात चाललंय काय? स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, पोलिसांकडून १८ मुलींची सुटका|VIDEO

दोन महिन्यापूर्वी कशेडी घाटात तिघांनी संपवलं, मृतदेहाचं गुढ उकललं; रायगडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक कारण

Mira Bhayandar : मारहाणीनंतर जीवे मारण्याचा धमक्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं? मिरारोडमधील मनसैनिकाने सगळंच सांगितलं

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

SCROLL FOR NEXT