Maharashtra Politics 2024 : बाटली आणि दोनशे; संभाजीनगरच्या चौकात कशामुळं राडा झाला? अंबादास दानवेंनी अख्खी स्टोरीच सांगितली!

Lok Sabha Election 2024 : संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा पहायला मिळाला. ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता दारुची बॉटल घेऊन प्रचार करत होता. त्यामुळे समोरचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून आले.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 Saam Digital

संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा पहायला मिळाला. ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता दारुची बॉटल घेऊन प्रचार करत होता. त्यामुळे समोरचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून आले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी संभाजीनगर मध्ये दारू पाहिजे की पाणी, अशा खोचक टोला लगावत त्यांनी संदीपान भूमरे यांना डिवचलं आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले?

आज जो काही क्रांती चौकमध्ये राडा झाला त्याचं कारण होतं आमचा एक कार्यकर्ता, दारुची बॉटल घेऊन प्रचार करत होता. दारू पाहिजे की पाणी पाहिजे असं विचारलं जात होतं. त्यावेळी समोरचे कार्यकर्ते त्याच्यावर धावून आले, नंतर आमच्या शिवसैनिकांनी त्यांना हिसका दाखवला.

संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्जात आपला दारूचा व्यवसाय आहे, असं नमूद केलं आहे. त्यामुळे आम्ही लोकांनी दारू पाहिजे की पाणी यावर विचार करायला हवा. यात गैर काही नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांवर कोणी धावून येत असेल तर आम्हीही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Maharashtra Politics 2024
Viral Video: डान्स असा की डोळ्यांना विश्वासच बसणार नाही; 12.50 कोटी लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

मनसे २०० नेमकं काय प्रकार?

आज क्रांती चौकातून रॅली काढत मनसेचे लोक जात होते त्यांना आम्ही 200 च्या नोटा दाखवत होतो. मनसेचे इंजिन आहे भाजपचा कोळसा आहे असा टोला देखील अंबादास दानवे यांनी लगावला. मनसेचे इंजिन कोणाच्या कोळशावर चालतं 200 च्या चालत हे आम्ही दाखवलं.

मराठवाड्यातील तीनही जागा निवडून येणार- विनोद घोसाळकर

मराठवाड्यातील माझ्याकडे जी जबाबदारी दिली त्या तीनही जागा निवडून येणार आहेत. त्याबरोबर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांचा अडीच लाखांनी विजय होईल. आमची आघाडी घट्ट आहे. सर्व छोठ्या मोठ्या पक्षांनी आणि संघटना यांनी खैरे यांना पाठिंबा दिलेला आले त्यामुळं त्यांचा विजय होईल ही कळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.काल संभाजीनगर मध्ये जी उध्दव ठाकरे यांची सभा झाली तरी देखील इथलं मैदान खैरे यांच्यासाठी तुडुंब भरलेले होते.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : 'म्हणून मी बीडमध्ये आलो होतो...' ; शरद पवार मनोज जरांगेंच्या भूमिकेवर नक्की काय म्हणाले? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com