Dhairyashil Mohite Patil Meet Sharad Pawar:  Saamtv
लोकसभा २०२४

Madha Loksabha: माढ्यात शरद पवारांना धक्का! 'शेकाप'कडून उमेदवारी अर्ज दाखल; धैर्यशिल मोहितेंच्या अडचणी वाढणार?

Madha Loksabha News: अनिकेत देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर आता माढयात पुन्हा बंडखोरी झाल्याचे समोर आले असून शेकापमधून ऍड. सचिन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर|ता. १९ एप्रिल २०२४

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अनिकेत देशमुख यांनी माढ्यातून अपक्ष लोकसभा लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र रात्री शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनिकेत देशमुख यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. अनिकेत देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर आता माढयात पुन्हा बंडखोरी झाल्याचे समोर आले असून शेकापमधून ऍड. सचिन देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा लोकसभा मतदार संघातून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र काल बारामतीमध्ये डॉ. अनिकेत देशमुख यांची शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर डॉ. अनिकेत देशमुखांनी माघार घेतल्याची घोषणा केली होती.

अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापमधूनच बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. सचिन देशमुख यांनी माढ्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गणपत देशमुख यांचा मीच वैचारिक आणि राजकीय वारस असल्याचा दावाही सचिन देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, माढ्यामध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशिल मोहिते पाटील यांच्याविरुद्ध महायुतीचे रणजितसिंह निंबाळकर असा सामना होणार आहे. अशातच आता शेकापमधूनही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकापचे बंड शमवण्यात शरद पवार यांना यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Maharashtra Live News Update : पवना धरणात 76 टक्के पाणीसाठा

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

SCROLL FOR NEXT