Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha Result: ना भाजप, ना ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्रात काँग्रेसचाच डंका; कोणाला किती जागा?

Gangappa Pujari

एकीकडे भाजपचा ४५ प्लसचा नारा घेऊन मैदानात उतरलेली महायुती, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ अन् दुसरीकडे मरगळलेली काँग्रेस, पक्षफुटीने घायाळ झालेले शरद पवार आणि ठाकरे गट यामुळे राज्याची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार हे फिक्स होते. अनेक मातब्बरांनी पक्षाची साथ सोडल्याने राज्यातील काँग्रेस मेटाकुटीला आल्याचे बोलले जात होते. मात्र याच काँग्रेसने लोकसभेत मुसंडी मारत राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

काँग्रेसचा डंका

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या होत्या. त्यापैकी तब्बल १३ जागा जिंकत राज्यामध्ये काँग्रेसने सर्वांनाच जोर का झटका दिला आहे. काँग्रेस संपली म्हणणाऱ्या महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा फक्त १ खासदार निवडून आला होता. १ वरुन आजच्या निवडणुकीत काँग्रेसने १३ जागांवर घवघवीत यश संपादन केले आहे.

ठाकरे गटाला किती जागा?

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. यांपैकी नऊ जागांवर ठाकरे गटाने यश मिळवले आहे. विशेष म्हणजे मविआमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ ठरेल, असे मानले जात होते. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही.

शरद पवारांची तुतारी वाजली

शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही लोकसभेच्या १० जागा लढवल्या होत्या. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पायाला भिंगरी बांधून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. शरद पवारांच्या या झंझावाती सभांना यश आल्याचे दिसत असून राष्ट्रवादीने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपला धक्का

या निवडणुकीत सर्वाधिक फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत २८ जागा लढवल्या होत्या. यापैकी फक्त ९ जागांवर भाजपला यश मिळाले आहे. भाजपचा तब्बल १७ जागांवर पराभव झाला असून अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे.

दुसरीकडे शरद पवारांची साथ सोडून महायुतीत जाणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निराशाजनक कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या रुपाने एकमेव खासदार निवडून आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ७ जागांवर यश मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

Marathi News Live Updates : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे.

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

SCROLL FOR NEXT