Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

Sujay Vikhe Patil Vs Nilesh Lanke: महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार रॅलीत एका कुटुंबाला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ही मारहण निलेश लंकें यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप सुजय विखेंकडून करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. ४ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या नेत्यांकडून प्रचार सभा, रॅलींचा धडाका सुरू आहे. अशातच महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार रॅलीत एका कुटुंबाला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ही मारहण निलेश लंकें यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप सुजय विखेंकडून करण्यात आला आहे. यावरुन आता नगरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

प्रचार रॅलीत मारहाण..

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली. प्रचार फेरी सुरू असताना गाडीला रस्ता देण्यासाठी विनंती केली असता वाद होऊन ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुजय विखेंचे गंभीर आरोप..

यावरुन आता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झालेत. ही मारहाण निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला आहे. तसेच पोलिसांना दम दिला तेव्हाच पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. ती कारवाई न केल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं अस सुजय विखे यांनी म्हटलं आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे.

दरम्यान, सुजय विखेंचे हे आरोप फेटाळून लावत मारहाणीचा आमचा कोणताही संबंध नसल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे. आम्हालाच त्रास देऊन पुन्हा आमच्यावर आरोप करतात असे म्हणत पोलिस आणि महसूल विभागाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

SCROLL FOR NEXT