Eknath Shinde- amit shah PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या संभाव्य 13 उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर, सूत्रांची माहिती

Political News : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्याने हा पेच आता दिल्लीतच सुटणार आहे.

Pramod Subhash Jagtap

Maharashtra Political News :

महायुतीच्या जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. भाजपने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. शिवसेनेला १३ ते १६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी शिवसेना शिंदे गटाकडून दिल्लीत सादर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या यादीत संभाव्य 13 उमेदवारांचा समावेश असलेली यादी काल रात्री दिल्लीत पाठवल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर करण्यात आल्याचं कळतंय. (Latest Marathi News)

महायुतीचा जागावाटपाचा तिढा दिल्लीतच सुटणार

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्याने हा पेच आता दिल्लीतच सुटणार आहे. लवकरच तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक अमित शाह यांच्यासोबत होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

कोणत्या जागांवर अद्याप रस्सीखेच?

  • दक्षिण मुंबई

  • उत्तर पश्चिम मुंबई

  • उत्तर मध्य मुंबई

  • रत्नागिरी -सिंधुदुर्ग

  • ठाणे

  • धाराशिव

  • गडचिरोली

  • भंडारा - गोंदिया

  • अमरावती

  • परभणी

  • सातारा

  • नाशिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: बदलत्या वातावरणामुळे त्वचा खूप ड्राय आणि डल झाली? मग या पेस्टमुळे स्किन होईल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

How To Increase Stamina : शरीराची ताकद वाढविण्यासाठी काय खावे?

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

SCROLL FOR NEXT