Nashik Loksabha Constituency:  Saamtv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha: ठाण्यात CM शिंदेंची हेमंत गोडसे अन् बोरस्तेंशी गुप्त खलबतं; नाशिकचा तिढा आज सुटणार?

Nashik Loksabha Constituency: रात्री नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gangappa Pujari

सचिन गाड, मुंबई|ता. २३ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडे उलटल्यानंतरही महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना शिंदे- गट तसेच भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच आज रात्री नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते या दोघांच्याही नावाची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची रात्री उशिरा ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

या बैठकीत नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसे यांना देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताकदीने कामाला लागण्याचे आदेशही दिल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर मुंबईमधील उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waykar) यांनी देखील रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या मतदार संघातून रविंद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वायकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT