Ajit Pawar On Sharad Pawar Yandex
लोकसभा २०२४

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Loksabha Election 2024: अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. ५ मे २०२४

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता बारातमीमधील प्रचार थांबणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे.

मैदान मिळवण्यात दादांची बाजी...

बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या हायहोल्टेज लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कूल मैदानावरील सभेने व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची सांगता सभा या ठिकाणी होईल.

सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव हायस्कूल मैदानात शरद पवार यांची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर शरद पवारांची सांगता सभा पार पडेल. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची बारामती शहरातून भव्य प्रचारफेरी निघणार आहे. तर दुपारी तीन वाजता अजित पवार यांची सांगता सभा मिशन हायस्कूलचे मैदानावर होईल.

दरम्यान, शरद पवार यांना प्रचारात साथ देण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शरद पवार गटाचा राज्यात प्रचार करण्यासाठी शिरूरसोबत अमोल कोल्हे यांनी राज्यव्यापी कॅम्पेन केलं. अमोल कोल्हे यांच्याकडे सहा मतदार संघांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. स्वतःच्या शिरुर लोकसभा मतदार संघात सकाळी प्रचार करुन अमोल कोल्हे हे सायंकाळी राज्यात प्रचार करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT