Nashik Loksabha News: Saamtv
लोकसभा २०२४

Nashik Loksabha : फक्त १ मिनिट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार; अनिल जाधवांमुळे नेते-कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

Nashik Loksabha News:अर्ज माघार घेण्यासाठी अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले अन् हेमंत गोडसेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी महायुतीच्या नेते, पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.

अभिजीत सोनावणे

नाशिक|ता. ६ मे २०२४

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी केलेले भाजप नेते अनिल जाधव उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याकडे नेत्यांचे लक्ष लागले होते. अखेर अर्ज माघार घेण्यासाठी अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले अन् हेमंत गोडसेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी महायुतीच्या नेते, पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजप नेते अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनिल जाधव यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनिल जाधव हे अर्ज माघार घेणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र अनिल जाधव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नसल्याने हेमंत गोडसे यांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर माघार घेण्यासाठी अवघा १ मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव पोहोचले. त्यानंतर हेमंत गोडसे, अनिल जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धावत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावे लागले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, बंडखोर अनिल जाधव अन् उमेदवार हेमंत गोडसे यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महंत शांतीगिरी महाराजांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आले आहे. शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. महायुतीनेच मला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेत शांतीगिरी महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूर बसस्थानकातून दुचाकी लंपास; सीसीटीव्हीत कैद प्रकार, चोरट्यांना कायद्याचा धाक नाही?

Peddi movie: 'राम चरण तिच्याकडे वासनेच्या नजरेने...'; जान्हवी कपूरचा 'ग्लॅमरस शो-पीस' म्हणून वापर, चाहते इतके का संतापले?

Political News: मुंख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, कॅबिनेट मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Pune : पुण्यातील भयंकर घटना! सिलिंडर बदलताना अचानक ब्लास्ट, एकाचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Shivrajyabhishek 2026: राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जाताय? मुंबई-पुण्याहून कसे पोहोचाल, किती येईल खर्च? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT