Rahul Gandhi Vs Narendra Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Loksabha Election: सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग! दिल्लीत मोठ्या घडामोडी, NDA अन् INDIA आघाडीच्या बैठका; २ दिग्गज किंगमेकरच्या भूमिकेत

Loksabha Election Result 2024: भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्यांना खास मित्रांची गरज आहे. त्यामुळेच आज दिल्लीमध्ये एनडीएकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर इंडिया आघाडीनेही महत्वाची बैठक बोलावली आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. ५ जून २०२४

देशातील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्यांना खास मित्रांची गरज आहे. त्यामुळेच आज दिल्लीमध्ये एनडीएकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर इंडिया आघाडीनेही महत्वाची बैठक बोलावली आहे.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. देशामध्ये भाजपाप्रणीत NDA सध्या 294 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 231 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत असतील.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत एनडीएच्या बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्षांना बोलावण्यात आले असून महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी जाणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीचीही आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची साथ कोणाला मिळणार? यावर सत्तेच्या सारीपाटाचा खेळ रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT