Lok Sabha Election Result 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : मराठवाड्यात मराठा आरक्षणाची धग; महायुतीची दाणादाण, 8 पैकी केवळ 2 जागांवर विजय

Marathwada Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत मविआनं मराठवाडा आणि विदर्भात चांगली कामगिरी केली आहे. मराठा आंदोलनाची धग असलेल्या मराठवाड्यात मविआनं सहा जागा जिंकल्या आहेत.

Sandeep Gawade

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मविआनं मराठवाडा आणि विदर्भात चांगली कामगिरी केली आहे. मराठा आंदोलनाची धग असलेल्या मराठवाड्यात मविआनं सहा जागा जिंकल्या आहेत. महायुतीला मोठा फटका बसला आहे. पाहूया एक रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीच्या सरकारला जेरीस आणलं होतं. जरांगेंच्या मागणीमुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. याचाच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात आंदोलनाची धग मोठी होती. जरांगेंचा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. आरक्षणाच्या आड येणा-याला पाडा असं वक्तव्य जरांगेंनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका सत्ताधारी महायुतीला बसल्याचं मानलं जातंय. मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी महायुतीनं सहा जागा गमावल्या आहेत.

महायुतीला मराठा आरक्षणाची धग

जालना - रावसाहेब दानवे (भाजप) - पराभूत

धाराशीव - अर्चना पाटील (अजित पवार गट) - पराभूत

लातूर - सुधाकर शृंगारे (भाजप) - पराभूत

नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) - पराभूत

परभणी- महादेव जानकर (रासप) - पराभूत

हिंगोली - बाबुराव कोहळीकर (शिंदे गट) - पराभूत

बीड - पंकजा मुंडे (भाजप) - विजयी

औरंगाबाद - संदिपान भुमरे (शिंदे गट) - विजयी

मराठवाड्यातील मतदानानंतर खुद्द अजित पवारांनी या निवडणुकीत जातीपातीवर मतदान झाल्याचं वक्तव्य केलं होतं. बीड, जालना, परभणीत मराठे आणि मराठेत्तर असं उघडपणे गट पडल्याचं सांगितलं होतं. त्याचा प्रत्यय या निकालात आलाय. लोकसभेच्या निकालाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमेटणार नाहीत यासाठी भाजप आणि महायुतीला अधिक खबरदारी घ्यावी लागणार यात शंका नाही.,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT