Uddhav Thackeray On Lok Sabha Result : सत्तास्थापनेचा दावा करणार; लोकसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास २९ जागांवर विजय मिळताना दिसत आहे. ठाकरे गटालाही ९ जागांवर विजय होताना दिसत आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray On Lok Sabha Result
Uddhav Thackeray On Lok Sabha ResultSaam Digital

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जवळपास ३० जागांवर विजय मिळताना दिसत आहे. ठाकरे गटालाही ९ जागांवर विजय होताना दिसत आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणातल्या निकालावर विश्वास नाही, काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अमोल कीर्तिकरांचा पराभवही त्यांनी फेटाळला असून केंद्रात सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकेर?

"देशाच्या जनतेने ताकद दाखवून दिली आहे. मी जनेतेचे अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही निष्ठुर झाले तरी एका बोटाने सत्ता आपण बदलू शकतो हे दाखवून दिले आहे. मी आणि संजय राऊत उद्या दिल्लीला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल त्या संदर्भात उद्या बैठक होईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"देशातील लोकशाही वाचवली पाहिजे. ही एकत्र येण्याची भावना आहे.उद्या सगळ्यांच्या मताने नेता ठरवलं जाईल.NDA कडे जागा जास्त आहे अस दाखवलं जात आहे. तसंच जे वैतागले आहेत ते इंडिया आघाडीत येतील. तशी बोलणी सुरू आहे.चंद्राबाबू नायडू यांना भाजपने कमी त्रास दिला नव्हता".

Uddhav Thackeray On Lok Sabha Result
Devendra Fadnavis: विधानसभेला पुन्हा जनतेत जाऊन लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू : देवेंद्र फडणवीस

अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला नाही, त्याविरोधात चॅलेंज करू. पण कोकणता पराभव हा अनाकलनीय आहे. तिथे काहीतरी गडबड असू शकते. मात्र नरेंद्र मोदींनी अजून सभा घेतल्या असत्या तरी महाविकास आघाडीला अजून चांगलं झालं असतं. मला या लोकांनी शिव्या दिल्या, पण मी बोल लो नाही की मी रोज शिव्या खाल्या, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

आम्हाला नकली शिवसेना म्हणत होते, मात्र आता असली नकली समजेल. पुन्हा बोलणी सुरू असल्याच्या चर्चेवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. पुन्हा बोलणी कशाला करता, पुन्हा छळायला. आम्ही पण भाजपसोबत होतो पण ईडी आणि इतर त्रास दिला. यंत्रणांचा दुरुउपयोग केला. आता पुन्हा त्रास द्यायला चंद्राबाबू जाणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

Uddhav Thackeray On Lok Sabha Result
Rohit Pawar News: 'बच्चा बडा हो गया...' सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी दादांना डिवचले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com