Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : ४०० पारसाठी भाजपसमोर असेल खडतर आव्हान; कशा असतील उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुका?

Uttar Pradesh Lok Sabha Election : आजपासून लोकसभेची रणधुमाळी सुरू होत आहे. उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील ८ जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, २७ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

आजपासून लोकसभेची रणधुमाळी सुरू होत आहे. उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील ८ जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, २७ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. पूर्वांचल भागातील या ८ जागांवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ मध्ये तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यावेळी दोन्ही निवडणुकांपेक्षा राजकीय समिकरणे काहीशी वेगळी असतील. त्यामुळे भाजपसाठी ४०० पारसाठी या जागा जिंकण्याचं आव्हान मोठं असेल, तर भाजपच्या आरएलडीसोबतच्या युतीमुळे सपा, बसपा आणि काँग्रेससाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका जिंकण्याचा मार्ग सोपा असणार नाही.

पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८ जागांवर निवडणूक होणार आहेत. यामध्ये सहारनपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीत मतदारसंघांचा समावेश आहे. तीन जागा रोहिलखंड विभागातील आहेत आणि पाच जागा पश्चिम उत्तर प्रदेशातील आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या भागात कडव्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या, तर सपा-बसपा युतीला पाच जागा जिंकण्यात यश आलं होतं. सपाला दोन तर बसपाने तीन जागा जिंकल्या. मात्र, नंतर रामपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळालं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सपाला काँग्रेससोबतच्या युतीचा फायदा होणार का?

2019 च्या निवडणुकीतील राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी यावेळी भाजपने आरएलडीला सोबत घेतलं आहे. पहिल्याच टप्प्यातील निवडणुकीत आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांची अग्नीपरिक्षा असणार आहे, कारण दोन जगांपैकी एका जागेवर एका जागेवर पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवावी लागणार आहे. २०१४ प्रमाणे या भागात भाजपचा क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असेल. सपा आणि बसपा यावेळी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सपाने काँग्रेससोबत युती केल्यामुळे बसपाने फारकत घेतली आणि स्वतंत्र निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे २०१९ जागां राखण्याचं आव्हान दोन्ही पक्षासंमोर असणार आहे. काँग्रेस सपासोबत असल्यामुळे त्याचा सपाला किती फायदा होतो, याकडेही लक्ष असेल.

कोण असतील उमेदवार?

भाजप आघाडीने ८ पैकी ४ जागांवर उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. कैरानामधून कैरानामधून प्रदीप चौधरी, मुझफ्फरनगरमधून संजीव बालियान, रामपूरमधून घनश्याम लोधी आणि नगीनामधून ओम कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तर मित्रपक्ष आरएलडीने बिजनौर जागेवर चंदन चौहान यांना तिकीट दिलं आहे. मुरादाबाद, सहारनपूर आणि पिलीभीत या जागांवर उद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

इकडे सपा ८ पैकी सात जागांवर निवडणूक लढणवार आह, तर काँग्रेस एका जागेवर नशिब अजमावणार आहे. सपाने मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक, नगीनामधून मनोज कुमार, कैरानामधून इक्रा हसन आणि बिजनौरमधून यशवीर सिंग यांना निवडणुकीत उतरवलं आहे. तर पीलीभीत, रामपूर आणि मुरादाबाद या जागांवर अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर काँग्रेस सहारनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून इम्रान मसूद निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे.

बसपने मुरादाबादमधून इरफान सैफी, पीलीभीतमधून अनीस अहमद खान उर्फ ​​फूल बाबू, सहारनपूरमधून माजिद अली, मुझफ्फरनगरमधून दयाराम प्रजापती आणि बिजनौरमधून विजेंद्र चौधरी यांना तिकीट दिलं आहे. बसपने कैराना, नगीना आणि रामपूर लोकसभा जागांसाठी अद्याप उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. बीएसपीने गेल्या निवडणुकीत बिजनौर, नगीना आणि सहारनपूर या जागा जिंकल्या होत्या, परंतु यावेळी त्यांनी आपल्या तीन विद्यमान खासदारांच्या जागी नवीन चेहरे उभे केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT