Nashik Lok Sabha Constituency Shinde Group Vs BJP Saam TV
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी; हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

Maharashtra Politics: नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचाच हक्क असून हेमंत गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार झाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत.

Satish Daud

Nashik Lok Sabha Constituency Shinde Group Vs BJP

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण, नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी, असा आग्रह भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जातोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचाच हक्क असून हेमंत गोडसे आतापर्यंत भाजपमुळेच खासदार झाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत. यासाठी भाजप नेत्यांनी एक बैठक देखील घेतली आहे. नाशिकमध्ये भाजपचे ३ आमदार आणि ६६ नगरसेवकांची ताकद असल्याने या जागेवर भाजपचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. (Latest Marathi News)

मोदी-शहांचं लोकसभेत ४०० पार खासदार निवडून येण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची नाशिकची जागा भाजपलाच सोडण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्षांनी वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून भाजप शिंदे गटावर दबावतंत्राचा वापर करतंय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

खासदार हेमंत गोडसे यांनी युतीधर्म पाळला नसून भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोडसेंच्या नावाची घोषणा करताना महायुतीच्या इतर कोणालाही विचारात का घेतले नाही? असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीचं जागावाटप अद्याप होणे असून ही जागा नेमकी कुणाला सुटणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Pune: आमदार माऊली कटकेंच्या पत्नीचे २ ठिकाणी मतदार यादीत नाव, अशोक पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT