लोकसभा निवडणूक घोषित होऊन अवघे दोनच दिवस झालेले असताना आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील 2022 च्या विधानसभा निवडणुका लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.
गुजरातमधील गांधीनगर येथील भाजप मुख्यालय श्री कमलम येथे आयोजित कार्यक्रमात सीआर पाटील यांनी आपचे शहराध्यक्ष जयंतीभाई जेठालाल मेवाडा यांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांच्यासह शेकडो समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मेवाडा हे 2022 मध्ये आम आदमी पक्षाचे असरवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते. त्यांना 15465 मते मिळाली होती. या जागेवर भाजपच्या उमेदवार दर्शना एम. वाघेला विजयी झाल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गुजरातमधील आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि गांधीनगर उत्तर मतदारसंघातून 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार मुकेशभाई पटेल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पटेल 16620 मते मिळवून चौथ्या स्थानावर राहिले. येथेही भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. (Latest Marathi News)
मेवाडा आणि पटेल यांच्याप्रमाणेच आम आदमी पक्षाचे नेते दिनेश भाई कपाडिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कपाडिया यांनी दाणीलीमडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांना 23 हजारांहून अधिक मते मिळाली होती.
दरम्यान, गुजरातमध्ये पक्ष लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असतानाच आम आदमी पक्षाला हा धक्का बसला आहे. 15 मार्च रोजीच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी स्वतः गुजरातचा दौरा केला होता. आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत युती केली आहे. आम आदमी पक्षाने गुजरातमधील दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर इतर जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.