Lok Sabha 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha 2024: उत्तरप्रदेशमध्ये एका चुकीमुळे भाजपचं आकड्यांचं गणित फसलं? लोकसभा निकालापूर्वी सी-व्होटरने केला मोठा दावा

Rohini Gudaghe

देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचाचं लक्ष आहे. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच सी-व्होटरने उत्तरप्रदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठा दावा केलाय. सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी यूपीबाबत धक्कादायक दावा केला आहे. बहुजन समाजवादी पक्षाची मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा जास्त असेल आणि भाजपला एक चूक महागात पडू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. तर मग भाजपने नेमकं असं काय केलंय, ज्यामुळे त्यांचा युपीमध्ये खेळ बिघडू शकतो, ते आपण जाणून घेऊ या.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यशवंत देशमुख म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये (Lok Sabha 2024) भाजपने जुन्या लोकांना तिकीट दिलं आहे. यातील अनेक खासदार लोकप्रिय नव्हते, तरीही त्यांना तिकीट देण्यात आलं. तिकीट निवडीत झालेल्या चुकीमुळे भाजपला यूपीमधून अपेक्षित विजय मिळताना दिसत नसल्याचं चित्र आहे. या स्थानिक निवडणुका होत आहेत. अनेक जागांवर चुरशीची स्पर्धा होत आहे. परंतु तिकीट वाटपातील चुकीमुळे भाजपाचं विजयाचं गणित बिघडू शकतं, असा अंदाज त्यांनी वर्तविला (UP Lok Sabha 2024) आहे.

सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख म्हणाले, संपूर्ण देशात स्थानिक मुद्द्यांवर निवडणुका होत नाहीत. परंतु ज्या ठिकाणी स्थानिक निवडणूका होत आहेत, त्या ठिकाणी (उत्तरप्रदेश) भाजपने तिकीट (Lok Sabha Election 2024 Result UP) वाटपात चूक केली आहे. देशात निवडणुका मोदींच्या नावाने लढवल्या जात आहेत. मोदींच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केलं जात आहे. भाजपने तिकीट वाटपात चूक केली तिथेही पीएम मोदींच्या नावाने तिकीट मागितलं जात आहे. या निवडणुकीचं स्थानिकीकरण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

विरोधकांची ही अतिशय योग्य रणनीती असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे. साडेपाच वर्ष पंतप्रधान मोदींवर (BJP) आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, केवळ स्थानिक निवडणुका त्यांच्या फायद्याच्या ठरतील. भाजपने योग्य उमेदवारांना तिकीट न दिलेल्या जागांवर स्थानिकीकरण करण्यात विरोधकांना यश आलंय. याचाच फटका भाजपला बसु शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: प्रेमासाठी काय पण..! बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं अन् कुलूप लावलं, लेकीचा प्रताप पाहून कुटुंबीय चक्रावले VIDEO

Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! उत्तर प्रदेशमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT