देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे एकूण ६ टप्पे पार पडले. आता सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. एकूण ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात मतदान होईल. या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. त्यात मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
लोकसभेच्या अंतिम टप्प्यात बिहार (८ जागा), चंदीगड (१ जागा), हिमाचल प्रदेश (४ जागा), झारखंड (३ जागा), ओडिशा (६ जागा), पंजाब (१३ जागा), उत्तर प्रदेश (१३ जागा) येथे मतदान होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील ९ जागांसाठी एकाच वेळी मतदान होईल. यासाठी एकूण ९०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लोकसभेचा शेवटचा टप्पा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण, या टप्प्यात एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वाराणसी : नरेंद्र मोदी (भाजप) विरुद्ध अजय राय (काँग्रेस)
गोरखपूर : रवी किशन (भाजप) विरुद्ध काजल निषाद (सपा)
गाझीपूर : अफजल अन्सारी (सपा) विरुद्ध पारस नाथ राय (भाजप)
मिर्झापूर : अनुप्रिया पटेल (एडीएस)
चांदौली : महेंद्र नाथ पांडे (भाजप)
पटना साहिब : रविशंकर प्रसाद (भाजप)
पाटलीपुत्र : मीसा भारती (आरजेडी) विरुद्ध राम कृपाल यादव (भाजप)
कांगडा : आनंद शर्मा (काँग्रेस)
मंडी : कंगना रणौत (भाजप) आणि विक्रमादित्य सिंग (काँग्रेस)
हमीरपूर : अनुराग ठाकूर (भाजप)
अमृतसर : तरनजीत सिंग संधू (भाजप)
जालंधर : चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) विरुद्ध सुशील कुमार रिंकू (भाजप)
लुधियाना : अमरिंदर सिंग राजा वारिंग (काँग्रेस) आणि रवनीत सिंग बिट्टू (भाजप)
भटिंडा : हरसिमरत कौर बादल (एसएडी) विरुद्ध गुरमीत सिंग खुदियान (आप)
पटियाला : प्रनीत कौर (भाजप) विरुद्ध धरमवीर गांधी (काँग्रेस) आणि बलबीर सिंग (आप)
डायमंड हार्बर : अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)
कोलकाता उत्तर : तापस रॉय (भाजप) विरुद्ध सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल काँग्रेस)
बारासात : काकोली घोष दस्तीदार (तृणमूल काँग्रेस) विरुद्ध स्वपन मजुमदार (भाजप)
बशीरहाट: रेखा पात्रा (भाजप) विरुद्ध हाजी नुरुल इस्लाम (तृणमूल काँग्रेस)
दुमका: सीता सोरेन (भाजप) विरुद्ध नलिन सोरेन (जेएमएम)
गोड्डा : निशिकांत दुबे (भाजप)
चंदीगड: मनीष तिवारी (काँग्रेस) विरुद्ध संजय टंडन (भाजप)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.