लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील मतदान आज शुक्रवारी होणार आहे. यामध्ये १०२ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास न होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. (First Phase of the Lok Sabha Elections)
पहिल्या टप्प्यात १ हजार ६२५ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. यामध्ये १३४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे विजयी भवितव्य १६.६३ कोटी मतदारांच्या हातात असणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालॅंड, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडु, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू कश्मीर, लक्षद्वीप, पॉंडेचरीमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
राज्यात विदर्भातील ५ मतदारसंघांमध्ये (Lok Sabha Election 2024) आज मतदान होत आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. (Nagpur, Ramtek, Bhandara-Gondia, Gadchiroli-Chimur and Chandrapur in Vidarbha are voting today...)
लोकसभा निवडणुकीत विदर्भात चुरशीची लढत होणार आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान मैदानात उतरले आहेत.
चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर भंडारा-गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे. त्यामुळे मतदार नेमकी कुणाला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दुसरीकडे, अरुणाचल प्रदेश व सिक्कीमधील ९२ विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देशातील कोट्यवधी मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.