Maharashatra Election: दिल्लीवारी आधी राजेंची बैलगाडी सवारी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

Satara Loksabha Election : साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजेंनी अर्ज दाखल केला.
 Udayanraje Bhosale  Satara Loksabha Election
Udayanraje Bhosale Satara Loksabha Electionsaam Tv

Udayanraje Bhosale Satara Loksabha Election : साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजेंनी अर्ज दाखल केला. ढोल- ताशा आणि हल्गीच्या गजरात उदयनराजेंनी शक्तिप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या प्रचारात शिवेंद्रराजे आणि अजित यांचाही सहभाग होता. पारंपारिक विरोधक आणि भावाचा पाठिंबा मिळाल्यामुळे राजेंची दिल्लीवारी सुकर होणार का पाहुयात या रिपोर्टमधून.

सातारा लोकसभेच्या मैदानात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. बैलगाडी सवारी करत उदयनराजेंनी ही निवडणूक शशिकांत शिंदेंसाठी तितकीशी सोप्पी नसल्याचं दाखवून दिलंय. कारण आता साताऱ्यात उदयनराजेंना भावाचीही साथ मिळालीय. उदयनराजेंच्या साथीने बैलगाडीचा कासरा धरून शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

भावाची सोबत मिळालीच. मात्र पहिल्यांदाच पारंपारिक विरोधक अजित पवारही सोबत असल्यामुळे उदयनराजेंना बळ मिळालंय. उदयनराजेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस आणि अजित पवारही आले होते. मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंसाठी स्वत: शरद पवार मैदानात आहेत. त्यामुळे शरद पवारांचे डावपेच मोडून काढण्यासाठी राजेंनी अजितदादांची मोठी मदत होणार आहे.. सोबतच साताऱ्याची जनताच उदयनराजेंना निवडून आणेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून साताऱ्याच्या जनतेने शरद पवारांना नेहमीच प्रेम दिलंय. उदयनराजेंनी पवारांना धक्का देत भाजपत प्रवेश केल्यानंतर साताऱकरांनी पवारांवरील प्रेम आपल्या कृतीतूनच दाखवून दिलं होतं. त्यामुळे उदयनराजेंच्या बैलगाडी सवारीत शरद पवार नावाचा मोठा डोंगर आहे.. हा डोंगर ओलांडण्यासाठी अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची मदत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 Udayanraje Bhosale  Satara Loksabha Election
Satara Constituency: उदयनराजेंना शरद पवार प्रखर विराेध करताहेत? दमयंतीराजेंनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडीओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com