Mahavikas Aghadi vs Mahayuti Saam TV
लोकसभा २०२४

Lok sabha Eelection 2024 : महायुती आणि मविआचं जागावाटप नेमकं कुठे अडलंय? कोणत्या जागांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली?

Mahayuti Seat Sharing : राज्यात ४५ पारचं लक्ष गाठण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी भाजपने शिवसनेच्या काही जागांवर आपला दावा केला आहे.

प्रविण वाकचौरे

Political News :

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरु आहे. एकीकडे नेते तयारीला लागले आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीतही हीच परिस्थिती आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना आता सर्वांना जागावाटपाची प्रतीक्षा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात ४५ पारचं लक्ष गाठण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी भाजपने शिवसनेच्या काही जागांवर आपला दावा केला आहे. भाजपने अनेक मतदारसंघात सर्वे केला होता. त्यात अनेक जागांवरील विद्यमान खासदारांबाबत नाराजीचा सूरू असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. त्यामुळे निवडून येतील असे उमेदवार देण्यावर भाजपने भर दिला आहे.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहेत. स्थानिक भाजप नेत्यांनीही ही जागा भाजपने लढवण्याचा आग्रह धरला आहे. हेमंत गोडसे यांच्याजागी आता राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघातूनही भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. येथे संजय राठोड यांच्या नावाचा सध्या विचार सुरु आहे. ठाण्यातील जागेवरही भाजपने दावा केला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यास आली आहे. मात्र त्यांच्याही उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. उमेदवारी जाण्याची शक्यता लक्षात घेता हेमंत पाटील यांची देखील हालचाली सुरु केल्या आहेत. हेमंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसह वर्षावर शक्तिप्रदर्शन केलं.

महायुतीत कोणत्या जागांवरुन तिढा

हिंगोली, हातकणंगले, नाशिक, सातारा, पालघर, ठाणे, कल्याण

महाविकास आघाडीतही सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. मात्र या जागांबाबत तोडगा काढण्यासाठी बैठका सुरु आहे. मात्र संपूर्ण जागावाटप नेमकं कसं असेल, हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Sayaji Shinde: कुंभमेळ्यासाठी झाडे तोडल्याने सयाजी शिंदे संतापले; सरकारला खडेबोल सुनावाले, म्हणाले आवाज उठवला तर....

ऐन निवडणुकीत Kidnapping? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवार अन् पतीला डांबून ठेवलं, 'असा' लागला सुगावा

Palghar Winter Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत लोणावळा-खंडाळ्याचा फील घ्यायचाय? मग हे Hidden Spots ठरतील बेस्ट

Leopard Attack : धक्कादायक! सरपणासाठी गेल्या परत आल्याचं नाहीत, बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT