Nashik Lok Sabha 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha 2024: नाशिकमध्ये आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; ५ व्या टप्प्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे अन् PM मोदींची सभा

Rohini Gudaghe

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती जोरदार तयारी करत आहे. नाशिकसाठी आजचा दिवस पॉलिटिकल ब्लॉकबस्टर ठरणार आहे. कारण नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी (Nashik Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावमध्ये सभा आज होणार आहे. तर दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारांची वणीमध्ये सभा पार पडणार आहे.

तर महाविकास आघाडीचे (Sharad Pawar) नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची नाशिक शहरात जाहीर सभा होणार आहे. तिन्ही नेत्यांच्या सभांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. नाशिकमध्ये आज भाजप आणि महाविकास आघाडी (Uddhav Thackeray Sabha) आमनेसामने असणार आहे. कुणाच्या सभेला किती गर्दी होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नाशिक आणि दिंडोरीमध्ये या सभांची (PM Modi) पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अगोदर नाशिकमधील जागेचा तिढा सुटत नव्हता. आता महाविकास आघाडी आणि महायुतीत मतांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये विविध ठिकाणी सुरक्षिततेच्या हेतुने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT