Chirag Paswan Saam Tv
लोकसभा २०२४

Bihar Lok Sabha: एलजेपीने उमेदवारांची यादी केली जाहीर, चिराग पासवान हाजीपूरमधून निवडणूक लढवणार

Lok Sabha Election 2024: बिहारमध्ये एनडीएच्या जागावाटपानंतर आता आघाडीचा पक्ष लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) आपल्या सर्व जागांवर उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bihar Lok Sabha 2024:

बिहारमध्ये एनडीएच्या जागावाटपानंतर आता आघाडीचा पक्ष लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) आपल्या सर्व जागांवर उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यावेळी हाजीपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

तर पक्षाने अरुण भारती यांना त्यांच्या जुन्या जमुई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह बिहारमधील लोकसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एलजेपीला (रामविलास) ला एनडीएच्या जागावाटपामध्ये हाजीपूर, जमुई, समस्तीपूर, खगरिया आणि वैशाली या जागा मिळाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये जमुईमधून अरुण भारती, खगरियामधून राजेश वर्मा, समस्तीपूरमधून शांभवी चौधरी, हाजीपूरमधून चिराग पासवान आणि वैशालीमधून वीणा देवी यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

चिराग यांनी स्वत: हाजीपूर मतदारसंघातून आणि त्यांचे मेहुणे अरुण कुमार भारती यांना त्यांच्या जमुई मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर चिराग पासवान यांनी खगरिया आणि समस्तीपूरमधून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. शांभवी चौधरी आणि राजेश वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय वैशालीमध्ये बंडखोर खासदार वीणा देवी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, एनडीए आघाडीने आपल्या पाचही घटक पक्षांमध्ये जागा वाटून घेतल्या आहेत. ज्या अंतर्गत भाजप 17 जागांवर, जेडीयू 16 जागांवर, एलजेपी (R) पाच जागांवर आणि हम-राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT