Lalu Prasad Yadav Yandex
लोकसभा २०२४

Lalu Prasad Yadav: ऐन लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, न्यायालयाने जारी केलं अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024: ऐन लोकसभा निवडणुकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील एमपी-एमएलए लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Satish Kengar

Lalu Prasad Yadav:

ऐन लोकसभा निवडणुकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील एमपी - एमएलए लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीच्या 26 वर्षे जुन्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उत्तर प्रदेशमधील व्यापारी राजकुमार शर्मा यांनी ग्वाल्हेरच्या तीन शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. राजकुमारने 1995 ते 1997 दरम्यान या कंपन्यांकडून शस्त्रास्त्रे आणि काडतुसे खरेदी केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर राजकुमार शर्माने ही शस्त्रे आणि काडतुसे बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि इतरांना विकली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 26 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. याआधी या प्रकरणात न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना 1998 पासून फरार घोषित केले होते. बिहारमध्ये 23 ऑगस्ट 1995 ते 15 मे 1997 या कालावधीत शस्त्रास्त्रांची ही अवैध खरेदी-विक्री झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 22 जणांना आरोपी करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

यात दोन आरोपींचा मृत्यू झाला असून सहा जणांविरुद्ध खटला सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह 14 आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे.

लालू यादव यांची मोदी सरकारवर साधला निशाणा

दरम्यान, याआधी शुक्रवारी सकाळी आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सोशल मीडियावर एक कविता शेअर करताना त्यांनी केंद्र सरकारला लबाड म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “झूठ का अंबार- मोदी सरकार, झूठ का दरबार- मोदी सरकार, झूठ का भंडार- मोदी सरकार, झूठ का व्यापार- मोदी सरकार….।

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर, धुळ्यासह नांदेड, बुलढाण्यात आंदोलन

Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Property In Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाजवळ बजेटमधील घरं कुठे मिळतील, अंदाजे किंमती किती? वाचा सविस्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

SCROLL FOR NEXT