konkan leaders comment after narayan rane declaration candidate from bjp ratnagiri sindhudurg constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Konkan Politics : भाजपनं नारायण राणेंना शेवटच्या बाकावर बसवलं : वैभव नाईक

ratnagiri sindhudurg constituency : शेवटपर्यंत आम्हाला मतदारसंघ सुटेल अशी आशा होती. किरण सामंत यांच्या कामाची चुणूक आम्ही पाहिली हाेती. शिवसेना नारायण राणेंच्या पाठिशी असल्याचे पदाधिका-यांनी स्पष्ट केले.

Siddharth Latkar

- अमाेल कलये / विनायक वंजारे

Narayan Rane :

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात नारायण राणेंच्या उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी भाजपला एवढा वेळ लागला. वर्गात पहिल्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या बाकावर बसवलं. तेराव्या यादीत राणेंची उमेदवारी घोषित केली. किरण सामंत (kiran samant) यांनी राणेंना शेवटच्या बाकावर बसवलं. त्यामुळे राणेंची पात्रता भाजप व महायुतीत केवढी आहे हे लोकांनी ओळखलं आहे. या मतदारसंघात राणेंचा पराभव करून विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी व्यक्त केला. तर महायुतीने दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर आपण अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असे आत्मविश्वासाने आज (गुरुवार) मंत्री नारायण राणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सामंत बंधूंचे नितेश राणेंनी आभार मानले

रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात आज मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली. मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत राणेंच्या पाठिशी शिवसेना खंबीर असल्याचे जाहीर केले. ही प्रेस संपताच आमदार नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन केला. दाेन्ही बंधूंचे राणेंनी आभार मानले.

भाजपा सोबत खांद्याला खांदा लावून करणार : राहूल पंडीत

रत्नागिरी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत म्हणाले भाजपा सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहाेत. राणे साहेबांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही एकत्र जाणार आहेत. किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नाही याचं वाईट वाटलं पण महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे नमूद केले.

किरण सामंत यांच्या राजकीय वाटचालीसाठी दोन्ही पक्ष खंबीर : दीपक केसरकर

रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात किरण सामंत हे इच्छुक होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील काही नेत्यांशी चर्चा केली. राणेंना उमेदवारी मिळाली असली तरी किरण सामंत यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी दोन्ही पक्ष खंबीर पणे उभे असतील असे फडणवीस यांनी आश्वासित केले आहे असे दीपक केसरकर यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार : नारायण राणे

माझी उमेदवारी जाहीर झाली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा व वरिष्ठांचे आभार मानतो. मी उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. मी शक्तीचे प्रदर्शन करत नाही. अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT