Sharad Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Sharad Pawar Press Conference Kolhapur: शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २ मे २०२४

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सात टप्प्यात लोकसभा निवडणुका कशासाठी? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले शरद पवार?

"मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी आहे. कडक उन्हाचा परिणाम झालाय. महाराष्ट्रामध्ये शहरातील मतदान चांगले होईल अशी अपेक्षा आहे. जनता मोदी सरकारवर नाराज आहे. ते आमच्या दौऱ्यात लोक सहभागी होत आहेत.मोदींना गतवर्षी पेक्ष्या महाराष्ट्र कमी जागा मिळतील, " असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.

"महाराष्ट्रात वेगवेगळ्या टप्प्यात निवडणूक का ? एक टप्प्यात निवडणूक होऊ शकत होती. मोदी महाराष्ट्रामध्ये वारंवार येत आहेत अधिक ठिकाणी जाण्याची संधी मिळावी म्हणून जाणीव पूर्वक 5 टप्प्यात निवडणूक घेतली. टक्केवारीची माहिती घ्यावी लागेल. लोक उदासीन आहेत का? हवामानाचा परिणाम आहे का हे पाहावे लागेल," असे शरद पवार म्हणाले.

मोदींवर निशाणा..

"पंतप्रधान मोदी फक्त शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका करतात. मोदी लोकांच्या समाधान करण्याचे मुद्दे नाहीत, त्या मुळे ते भरकटवत आहेत. मोदींचे भाषणातील पाहिले 3, 4 वाक्य असतात ती कोणीतरी लिहून दिलेली असतात. स्थानिक मुद्द्यांवरुन भाषण सुरू करणं ही मोदी स्टाईल आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Hawk Eye: ऑपरेशन हॉक आय'द्वारे ISISचे 70 अड्डे उद्ध्वस्त, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ४५.१४ टक्के मतदान

Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

Success Story : जव्हारमधील शेतकऱ्याची गगन भरारी! दोन एकर शेतीतून तरुण बनला लखपती

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT