PM Modi Property Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मोदींनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा तपशील दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Property:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मोदींनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा तपशील दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांची एकूण संपत्ती ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच 2019 च्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी एकूण संपत्ती २ कोटी ५१ लाख रुपये असल्याचे घोषित केले होते. २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी आपली संपत्ती १ कोटी ६५ लाख दाखवली होती. १० वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत अंदाजे १ कोटी ३७ लाख ६ हजार ८८९ रुपयांनी वाढ झाली आहे.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशीलही दिला आहे. ज्यामध्ये २०१८-१९ मध्ये त्यांचे उत्पन्न ११ लाख १४ हजार २३० रुपये होते. २०१९-२० मध्ये १७ लाख २० हजार ७६० रुपये आणि २०२०-२१ मध्ये १७ लाख ०७ हजार ९३० रुपये होते, असे म्हटले आहे. तसेच २०२१-२२ मध्ये १५ लाख ४१ हजार ८७० रुपये आणि २०२२-२३ मध्ये २३ लाख ५६ हजार ०८० रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

यामध्ये सांगण्यात आलं आहे की, मोदींनी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी पास केली. त्यांनी १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली.

तसेच नरेंद्र मोड यांनी १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवल्याचं त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या असल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. ज्याची किंमत सुमारे २ लाख ६८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रात जशोदाबेन यांचा उल्लेख त्यांची पत्नी म्हणून केला आहे. तसेच पीएम नॅशनल सेव्हिंग स्कीममध्ये ९ लाख १२ हजार ३९८ रुपये जमा असल्याची माहितीही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 2: डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो लवकरच धावणार, ५.३९ किमीचा मार्ग अन् ५ स्थानके; कधीपासून सुरू होणार?

बीडमध्ये चाललंय काय? वसतिगृहातील चिमुकल्यांना धुवायला लावले कपडे अन् बाथरूमची सफाई | VIDEO

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा जीआर अडचणीचा ठरणार, फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनाच शंका; जरांगेंनाही सुनावलं

Bad Times Sign: वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात हे संकेत, वेळीच ओळखा

Akshay Kumar: 'गुटखा तोंडात दाबून...' पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT