मुंबई : बॉलिवूडची क्विन कंगना रणौतला लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. कंगना ही हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचदरम्यान, मी लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास बॉलिवूडला रामराम करणार, अशी मोठी घोषणा कंगनाने केली आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान कंगना रणौतने मोठी घोषणा केली आहे. कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेल. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.
'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेल. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे'.
राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.